ज्युनियर व सब-ज्युनियर कॅरम निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन

| अलिबाग । प्रतिनिधी |

रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित ज्युनियर व सब-ज्युनियर जिल्हाजिंक्यपद कॅरम निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन 25 ते 31 डिसेंबर दरम्यान होणार आहे. निवड चाचणी स्पर्धा सब-ज्युनियर वयोगट 12 वर्षांखालील मुलं-मुली व 14 वर्षांखालील मुलं-मुलींचा असेल, तर ज्युनियर वयोगट म्हणजे 18 वर्षांखालील मुलं-मुली व 21 वर्षांखालील मुला-मुलींचा गट असणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व खेळाडूंनी आपापला वयाचा दाखला आधारकार्ड व शाळेचं बोनाफाईड आणणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणार्‍या सर्व खेळाडूंनी आपली इन्ट्री रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव दिपक साळवी 7020602335 / 7020602335, यांच्याकडे गुरुवार 22 डिसेंबर 2022 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत जमा करावी.

खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग (इन्ट्री) निश्‍चित करतांना आपले संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, वयाचा दाखला, वयोगट व प्रवेश फी रु. 180 व रजिस्ट्रेशन फी रु.20 असे रु.200 जमा करावी. हि स्पर्धा एकदिवसीय असेल, ह्या स्पर्धेसाठी वरिष्ठ वयोगटातील खेळाडूंचं सहकार्य करावं व आपापल्या विभागातील युवा कॅरम खेळाडूंना मार्गदर्शन करून स्पर्धेत सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावं, अशी माहिती रा.जि कॅरम असोसिएशनचे सचिव दिपक साळवी यांनी दिली.

Exit mobile version