। खांब । वार्ताहर ।
एस.एन.एस.स्पोर्टस क्लब रोहा पुरस्कृत मंगळवार (दि.9) ते शुक्रवार (दि.12) या कालावधीत कुमार गट कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जय बजरंग कबड्डी मैदान रोहा येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत करण्यात आले आहे.
रूपेश रटाटे, दिनेश कांबळे, भरत मालुसरे, गौरव नाईक, राकेश गायकवाड या तज्ञ प्रशिक्षकांकडून खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या शिबिरात 1 जानेवारी 2005 नंतर जन्मतारीख असणार्या व फक्त रोहा तालुक्यातील खेळाडूंना प्रवेश दिला जाणार असून अमर सलागरे, शोण गावंड, सुयोग नांगरे, रोहित म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व सदस्य या प्रशिक्षणाचे यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य करीत आहेत. या प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी राज मोरे 8624942769 व सौरव वाघवले 8530930828 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.