कोकण विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नमो महारोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

| रायगड | वार्ताहर |

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीन ठाणे जिल्ह्यामध्ये 24 व 25 फेब्रुवारी रोजी नमो महारोजगार कोकण विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे येथील आयलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडाया या ठिकाणी मेळावा पार पडणार आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील विविध औद्योगिक आस्थापना, उद्योजक, विविध स्टार्टअपचे स्टॉल, स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी विविध महामंडळे, कौशल्य व करिअर मार्गदर्शन करणाऱ्या संस्था सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचा बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहणे गरजेचे आहे. या मेळाव्यासाठी नोंदणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड येथे त्वरीत संपर्क साधून नोंदणी करावी. तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02141-222029, 9421613757 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Exit mobile version