कृषी संजीवनी पंधरवड्याचे आयोजन

। माणगाव । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव यांच्यामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने कृषी संजीवनी पंधरवडाचे आयोजन दि. 17 जून ते 01 जुलै या दरम्यान करण्यात आले आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी, माणगाव अजय वगरे यांनी माहिती देताना सांगितले की, या कृषी संजीवनी पंधरवड्या अंतर्गत तालुक्यामध्ये प्रत्येक दिवशी गावागावांमध्ये कृषीविषयक कार्यक्रम राबविले जातात आहेत. यामध्ये प्रत्येक दिवशी विविध विषयांवर मार्गदर्शन व मोहीम राबवली जाणार आहे.

त्यामध्ये बीज प्रक्रिया, पी.एम. किसान दिन, जमीन सुपीकता जागृती दीन, गुणवत्तापूर्वक निविष्ठा यांची ओळख, महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार दिन, पिक विमा जनजागृती दिन, हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान दिन, आंबा व काजू लागवड दिन, भात व नागली लागवड दिन, तुर व इतर कडधान्य लागवड दिन, कीड व रोग नियंत्रण उपाय योजना, कृषी क्षेत्रातील महिला शेतकर्‍यांचा सन्मान, शेतकरी मासिक प्रचार प्रसिद्धी व वर्गणीदार गोळा करणे, प्रगतशील शेतकरी संवाद दिन इत्यादीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

Exit mobile version