लोक अदालतीचे आयोजन

| अलिबाग | वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये रविवार (दि.30) रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग अमोल शिंदे यांनी दिली आहे. तरी या दिवशी होणार्‍या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग एस. एस. सांवत यांनी केले आहे.

Exit mobile version