। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात मंगळागौर स्पर्धेचे आयोजनकरण्यात आले होते. खेळ व गाण्यांच्या माध्यमातून मंगळागौरीच्या परंपरेचे संवर्धन व्हावे, महिलाच्या कलागुणांना वाव मिळावा, या प्रमुख उद्देशाने रसायनी पाताळगंगा महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळागौर स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा उमा मुंढे यांच्या नेतृत्वाखाली वर्षा पाटील, दिव्या जांभळे, दिप्ती म्हात्रे,वर्षा शिंदे, रेश्मा चौधरी आदी महिलांनी मिळून स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण बारा संघांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी दिप्ती म्हात्रे, वर्षा शिंदे, दिव्या जांभळे, वृषाली म्हात्रे, विनया मुंढे, रेश्मा चौधरी, मृताली शिंदे, शारदा कळे, अनुजा मुंढे, दिपिका भंडारकर, श्वेता कांबळे, उर्मिला डवळे, प्रतिक्षा कुरंगळे, सदगुणा पाटील, प्रमिला दळवी, सुगंधा पिंगळे, प्राची पाटील, मिना खाने, नैना रसाळ, रेश्मा भगत, मिनाक्षी पाटील, अंजना भोईर, समिक्षा पाटील, भाग्यश्री पवार, सुजाता सोनावणे, सुवर्णा मुंढे या महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.