| माणगाव | वार्ताहर |
माणगावात पुणे-दिघी महामार्गावर रिळे-पाचोळे फाटा येथील भव्य मैदानावर छावा प्रतिष्ठानतर्फे संस्थापक अध्यक्ष निलेश थोरे व सहकार्यांच्या पुढाकाराने शनिवार दि. 23 ते बुधवार दि. 3 जानेवारी 2024 पर्यंत माणगाव महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत दिमाखदार कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. नृत्यांगना गौतमी पाटील, सिने अभिनेत्री माधुरी पवार, नृत्यांगना मयुरी उतेकर हे महोत्सवाचे विशेष आकर्षण असून महोत्सवात अनिस नवाब विरुद्ध सनम साहिबा यांच्यात सुफी कव्वालीचा जंगी सामना रंगणार आहे. या महोत्सवात स्टॉल बुकिंग व जाहिरातींसाठी हितेन छेडा मो.क्र. 7741091524 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच या महोत्सवाचा लाभ रसिक प्रेक्षक, नागरिकांनी जरूर घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.