पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे आयोजन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि.03) संपूर्ण मुरुड तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस देण्यात येणार आहेत. ही मोहीम मुरुड तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपुर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. यासाठी ग्रामीण भागातील 2 प्राथमिक आरोग्य केंद्र, 1 प्राथमिक आरोग्य पथक व शहरी भागातील ग्रामीण रुग्णालय मुरुड-जंजीरा यांच्या कार्यक्षेत्रात बुथ उभारण्यात येणार असुन सदर बुथवर (दि.03) सकाळी 08:00 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्यात येणार आहे.

मुरुड तालुक्यात ग्रामीण व शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी 4051 आहेत. त्याकरीता ग्रामीण भागात 70 बुथ व शहरी भागात 8 बुथ असे एकुण 78 बुथवर पालिओचे डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात साळाव चेक पोस्ट, काशिद बिच, मुरुड चेक पोस्ट व राजपुरी जेट्टी इत्यादी ठिकाणीसुध्दा पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाकरीता 189 कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आलेली असुन त्यात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा तसेच, खाजगी संस्थांचा देखील यामध्ये सहभागी करुन घेण्यात आलेले आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस पाजून या कार्यक्रमात सहभागी व्हावे व सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, मुरुड तालुका आरोय अधिकारी, मुरुड तहसिलदार यांनी केले.

Exit mobile version