भातपिक शेती शाळेचे आयोजन

। आंबेत । वार्ताहर ।

म्हसळा तालुक्यातील खामगाव परिसरात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत फसल विमा पाठशाळा व भातपिक शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फसल विमा पाठशाळा व भातपिक शेतीशाळामध्ये विमा काढलेल्या शेतकर्‍यांना विमा पॉलिशीचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकर्‍यांना प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यतची माहिती देण्यात आली.तालुका कृषी अधिकारी ढंगारे यांनी भात पिकात कामगंध सापळे उपयोग व व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. श्रीहनुमंत सुतार यांच्या शेतावर जाऊन शेतकर्‍यांना भात पिकावरील निळे भुंगेरे व तुडतुडे या किडींची ओळख व नियंत्रणाबाबत कृषी पर्यवेक्षक कदम यांनी मार्गदर्शन केले.

कृषी सहाय्यक गणेश प्रकाश देवडे यांनी शेती शाळेस उपस्थित शेतकर्‍यांचे आभार मानले. तुषार दवंडे, एकनाथ खामगावकर, नितीन नवघरे, नरेश पारावे, निलेश लांबे, दिनेश पारावे, हनुमान सुतार, प्रकाश सुतार, आनंत पारावे, प्रमोद जुजुम आदी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version