बीजप्रक्रिया कार्यक्रमाचे आयोजन

तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यामध्ये बीज प्रक्रिया मोहीम लोक सहभागातून विनाअनुदान तत्वावर राबविण्यात येणार असून बियाणे बदल कमी असलेला भात पिकामधे शेतकऱ्याकडील स्वतःचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त आहे. अशा बियाणावर जमिनीतून व बियांणाद्वारे होणार्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक संरक्षणावरील खर्चात वाढ होते परिणामी उत्पादन खर्च वाढतो त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे बियाण्यावरती बिज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे यामुळेच कृषी विभागामार्फत तळा तालुक्यातील सर्व गावामध्ये बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम राबवण्यात येत आहे
 बीजप्रक्रिया मोहिमे अंतर्गत शेतकऱ्यांना स्वतः कडील मागील वर्षाचे घरगूती वापरात येणाऱ्या बियाणास बीजप्रक्रिया करण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भात बियाण्यास बीजप्रक्रिया व जीवाणू खताची बीजप्रक्रिया याचा त्यात समावेश आहे.
या मोहिमे अंतर्गतच तालुक्यातील मौजे रोवळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सर्व प्रथम कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे यांनी बीज प्रक्रिया मोहिमेचे प्रास्तविक केले, तर तालुका कृषी अधिकारी अनंत कांबळे यांनी बीजप्रक्रिया फायदे सांगितले. गोविंद पाशीमे यांनी आत्मा योजने अंतर्गत पौष्टिक तृणधान्य  प्रात्यक्षिक अंतर्गत  राळा, वरी व सावा या पिकाचे बियाणे उपलब्ध झाले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी अनंत कांबळे, कृषी पर्यवेक्षक सचिन जाधव, कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे, व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version