शिवजयंती उत्सवाचे आयोजन

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरूड जंजिरा नगरपरिषदेतर्फे सोमवारी (दि.19) शासकीय शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आयोजित केले आहे. यानिमित्त सायंकाळी 4 वाजता शिवप्रतिमेची मिरवणूक बापूजी देव मंदिर लक्ष्मीखार येथून निघून, दिघे लॉज, लक्ष्मी नारायण मंदिरा जवळून आझाद चौक, भाजी मार्केट मार्गे नगरपरिषद प्रांगणाकडे जाणार आहे. येथे मिरवणुकीचे सभेत रूपांतर होईल. तरी सर्वानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे.

Exit mobile version