। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुका कुणबी भवन समाज साले ग्रुपमधील इयत्ता दहावी व बारावीत 60% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यर्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी (दि.14) सकाळी साडेअकरा वाजता माणगावातील कुणबी भवन येथे आयोजित केला आहे. तरी ग्रुपमधील सर्व गावातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिकेची प्रत कुणबी भवन येथे रविंद्र अर्बन 9373343416 यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन महादेवराव बक्कम व भागोजी डवले यांनी केले आहे.