। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ तसेच रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन याच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. या टेबल टेनिस स्पर्धा दि. 29 व 30 जुन या कालावधीत पनवेल येथील सिडको समाज मंदि येथे असोसिएशनचे अध्य्क्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत.
या स्पर्धा ‘लीग कम नॉक आऊट’ पद्धतीने घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्रत्येकी चार खेळाडूंचे गट असणार असून पहिल्या सामन्यात एखादा खेळाडू हरला तरी त्या खेळाडूला अजुन दोन वेळा खेळण्यासची संधी मिळणार आहे. यामुळे त्या खेळाडूचे स्पर्धेतील आवाहन कायम राहणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संजय सुदाम कडू याच्या हस्ते शनिवार (दि.29) सकाळी 10 वाजता होणार आहे. तसेच, स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी (दि.30) सायंकाळी 6.00 वाजता करण्यात येणार आहे. या स्पर्धा नवोदित व 11,13,15,17,19 वर्षां खालील मुली व मुले, पुरूष व महिला आणि प्रौढ पुरूष एकेरी अशा एकूण आठ गटांत घेण्यात येणार आहेत.







