| पनवेल | प्रतिनिधी |
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकार मित्र असोसिएशन, आपला आधार फाउंडेशन, श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टतर्फे महिला लोकसेवा चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील लकी ड्रा विजेत्यांना सोन्याची नथ, कुलर, चांदीचे नाणे, इस्त्री, पैठणी यासह विविध आकर्षक बक्षिसे लकी ड्रामध्ये दिली जाणार आहेत. शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी दहापासून स्पर्धेला सुरुवात होईल. आकर्षक व दर्जेदार बक्षीसांची लयलूट या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला व संघाना करता येणार आहे.
दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेत महिलांचे गट, महिलांच्या संस्था, लोकसेवक महिला, हाऊसवाईफ महिलांचे संघ सहभागी होतात. बक्षीसांची लयलूट करताना त्याही नविन मैत्रीणींसोबत आणि अनुभवासोबत बरेच काही या स्पर्धेतून घेउन जातात. या स्पर्धेत विजेत्यांबरोबरच सहभागी प्रत्येक महिलेला असोसिएशनतर्फे भेटवस्तू दिली जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 14 मेपर्यंत नावनोंदणीची मुदत आहे. इच्छूकांनी नावनोंदणीसाठी आयोजक कार्याध्यक्ष नितीन जोशी व सहसचिव प्रवीण शेंडे यांच्याशी 9320646555, 9321158090, 9322282227 या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. (अटी व शर्ती लागू ) स्पर्धेचे नियम व अटीमध्ये बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे असतील. या स्पर्धेत लोकसेवक महिला संघाना प्रथम प्राधान्य दिले जाईल. प्रथम, द्वितीय व तृतीय संघाच्या सर्व विजेत्या महिलांना पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे पैठणी देण्यात येणार असल्याचे पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक व अध्यक्ष प्रोफेसर एस. क्रिष्णकुमार यांनी सांगितले, तर बक्षिसांमध्ये व स्पर्धेच्या नियमांमध्ये आयत्यावेळी बदल करण्याचे अधिकार सर्वस्वी आयोजकांकडे असतील, याची कृपया नोंद घ्यावी.
झाशीची राणी चषकाचे आयोजन
