। पेण । वार्ताहर ।
पेण एज्यूकेशन सो.च्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात मंगळवारी (दि.15) भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी विभाग व मराठी वाड्म.य मंडळ, डी.एल.एल.ई.युनीट आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘वाचू आनंदे’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप, कला विभाग आणि इतिहास विभाग प्रमुख डॉ. यु. ए. खाडिलकर, हिंदी विभाग प्रमुख व डी.एल.एल.ई. युनिटचे समन्वयक डॉ. डी.के. बामणे, ग्रंथपाल जी.जी. जोशी, विजया ठाकूर, सुषमा खोत, राधिका गोंधळी, सुप्रिया धुमाळ आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.