| सोगाव | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे रविवारी (दि.8) ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावतर्फे महिलांसाठी होम मिनिस्टरसह इतर विविध प्रकारच्या भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला बचत गटांच्या अध्यक्षा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापंगावचे संतोष राऊत, जगदीश सावंत, वसीम कुर, अजित घरत, विजय भगत, स्नेहा रुत, प्रभाकर मोहिते, उत्तम राऊत, मुद्स्सर कुर, किफायत कुर, विश्वास थळे, सुमेश थळे, प्रमोद दळवी, राजेंद्र घरत, माजी मज्जीद कूर, दत्तात्रेय राऊत, दत्ताराम राऊत, मनीष म्हात्रे, मंगेश सुतार, प्रवीण पाटील, तेजस काठे, उत्तम राऊत, गितेश करळकर, संतोष रुत, शफी वाकनीस व मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील व मापगाव पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला व पुरुष ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात अनेक कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी डी. महेश व त्यांच्या कलाकारांनी महिलांच्या अनेक मनोरंजनात्मक स्पर्धा घेतल्या. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. होम मिनिस्टर स्पर्धेत मयुरी थळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रोख रक्कम पंधरा हजार रुपये देण्यात आले. तर निमा पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, त्यांना रोख रक्कम दहा हजार रुपये देण्यात आले. तसेच अनन्या अल्पेश मल्हार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना रोख रक्कम पाच हजार रुपये देण्यात आले. यासोबतच संघवी हुमणे, रेणुका थळकर, चित्रा चापडे, राजश्री जाधव, कावेरी दळवी या सर्व महिलांना चतुर्थ क्रमांक विभागून प्रत्येकी रोख रक्कम तीन हजार देण्यात आले. कार्यक्रमास सर्व थरांतील व सर्व समाजातील महिलांची उपस्थिती हि लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष राऊत यांनी केले. तसेच ‘होम मिनिस्टर’ हा संपूर्ण कार्यक्रम डि. महेश यांनी सूत्रसंचालित केला.






