| नवीन पनवेल | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष कामोठे कार्यकर्ते त्यांच्याकडून नेत्र तपासणी शिबीर, वृक्षारोपण कार्यक्रम, वह्या वाटपाचे आयोजन 28 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी आमदार बाळाराम पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी नगरसेवक प्रमोद भगत, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, युवा नेते आदी मान्यवर उपस्थित होते. प्रीतम म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करून माजी आमदार बाळाराम पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच माजी सभापती पनवेल पंचायत समिती, माजी नगरसेवक प्रमोद भगत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. आणि शिबिराला आलेल्या नागरिकांचे आभार मानले.