जल जाणीव सप्ताहाचे आयोजन

पनवेल । वार्ताहर ।
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज व जाणीव सामाजिक सेवा संस्थेने संयुक्तरित्या विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये मचला जाणू या पाण्यालाफ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान, मजल जाणीवफ या विषयावर चित्रकला स्पर्धा, हौसिंग सोसायटीमधील घरांची कुशल प्लंबरव्दारे पाहणी, रिक्षांवर जल संदेशाचे स्टीकर्स तसेच जल जाणीव फेरी असे विविध कार्यक्रम आठवडाभर आयोजित करण्यात आले होते.

पाण्याचा एक थेंब हा सुद्धा खूप मोलाचा आहे, याची जाणीव नागरिकांना व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे सेवानिवृत्त सह संचालक डॉ. सतीश उमरीकर यांनी मचला जाणू या पाण्यालाफ या विषयावर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनतर 8 वी व 9 वी च्या विदयार्थ्यांसाठी मजल जाणीवफ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले होते. या स्पर्धेत 140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या जल जाणीव फेरीत विद्यार्थी,त्यांचे शिक्षक वर्ग, जाणीव संस्थेचे व रोटरी क्लब ऑफ सनराइजचे सदस्य, त्यांचा परिवार तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते, कर्मचारी, संत रोहिदास मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते.

Exit mobile version