संस्थेने आदिवासींना दिला ‘आश्रय’

अत्यावश्यक वस्तूंचे केले वाटप
। खांब-रोहे । वार्ताहर ।

आश्रय सामाजिक संस्थेमार्फत रोहे तालुक्यातील बैलवाडी आदिवासीवाडी,बागायतवाडी, डोंगरवाडी, मढाली आणि वरची मढाली आदीवासीवाडी या सर्व वाडीतील आदिवासी बांधव आणि भगिनी यांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी आदिवासी महिलांना हळद- कुंकु मान-सन्मानाने लावून साड्यांचे वाटप करण्यात आले.तसेच ब्लँके,टॉवेल,लहान मुला-मुलींचे कपडे,बिस्किटे,सँनेटरीन नॅपकिन आदींचे वाटप करण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपत आश्रय सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी वाड्यां-वस्त्यावर येऊन अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केल्याने आम्ही या संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पार्टे व सर्व सदस्यांचे शतशः ऋण व्यक्त करीत असल्याचे मनोगत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रविंद्र तारू यांनी व्यक्त केले.
यावेळी आश्रय सामाजिक संस्थेचे प्रमोद पार्टे,वैशाली पार्टे, रवींद्र तारु, छाया तारु,लक्ष्मण धनावडे,रामचंद्र शिंदे, रोशन बारस्कर, रोशन पडवळ, उत्तम शिंदे आदींह विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version