| पाली/गोमाशी | वार्ताहर |
शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्कार शिबिराचे 16 ते 22 डिसेंबर भार्जे येथे आयोजन करण्यात आले आहे. या श्रमसंस्कार शिबिरास मंगळवार 19 डिसेंबर रोजी सुधागड तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे यांनी भारतीय निवडणूक प्रक्रिया आणि मतदार नोंदणी या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर दी सिव्हिलियन अकॅडमीचे अजित खराडे, वैभव वारे, सलीम शेख यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील सेवा संधी या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी भार्जे गावचे सरपंच चिंतामण सुतार, मंडळ अधिकारी साळवे व त्यांचे सहकारी आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण जैस्वार तर आभार वैष्णवी पोंगडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. स्नेहल बेलवलकर व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.







