सुधागडात मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन

| पाली/बेणसे | वार्ताहर |

सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने व सुधागड तालुका महिला राष्ट्रवादी यांच्या सौजन्याने श्रावणातील भव्य श्रावणसरी मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात मंगळागौरी पुजन, दीपप्रज्वलन, मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी महाराष्ट्रीयन व पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक यशश्री ग्रुप धुंडीविनायक पाली, व्दीतीय क्रमांक संगारीमाता महिला मंडळ बलाप, तृतीय क्रमांक संस्कृती ग्रुप पाली, उत्तेजनार्थ रफ ॲन्ड टफ ग्रुप पाली, उत्तेजनार्थ जय श्रीराम महिला मंडळ भालगुल, तसेच सर्व स्पर्धक महिलांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमास उमाताई मुंढे, रुपाली भणगे, वृषाली म्हात्रे, गायश्री गोडबोले, संदेश शेवाळे, ललित ठोंबरे, सुनिल राऊत, अंकुश आपटे, सुलतान बेनसेकर, सुधिर भालेराव, सुजाता वडके, विद्या सांवत, अस्मिता घरत, स्वाती कदम, रचना जाधव, शहर संगिता साखरले, शुभांगी कारखानीस, नलिनी म्हात्रे, सुप्रिया राऊत, मधुरा वरंडे, सुंनदा देशमुख, सुजाता भोईर, विभावरी बुरूमकर, रुचिता बेलोसे, सई शेवाळे, करुणा ठोंबरे, शबनम बेनसेकर उपस्थित होते.

Exit mobile version