पीएनपी महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागांतर्गत सोमवारी ‘वित्तीय नियोजन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून जयेश किशोर पाटील उपस्थित होते. आपल्या जीवनात वित्तीय नियोजनाचे असलेलं महत्त्व समजावून सांगताना विद्यार्थ्यांनी कमी वयापासूनच गुंतवणुकीला प्राधान्य दिले पाहिजे असे मत त्यांनी मांडले. तसेच म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट यांमधील संकल्पना समजावून सांगताना शेअर मार्केटचे फायदे-तोटे विद्यार्थ्याना सांगितले. कोणती गुंतवणूक सुरक्षित ठरेल याचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. उल्लेखनीय बाब म्हणजे जयेश पाटील हा कला विभागाचे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कला विभाग प्रमुख नम्रता पाटील, वृषाली घरत आणि आशुतोष गुरव व अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे यांनी तर आभार प्राची वैद्य यांनी मानले.

Exit mobile version