खोपोली येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोली येथील हाय डेफिनेशन स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंटद्वारे आयोजित 15 वर्षांखालील खेळाडूंसाठी स्पिरिट शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 1 नोव्हेंबरपासून खोपोली येथील डीपी रोडवरील मैदानावर खेळावली जाणार आहे.

संपूर्ण स्पर्धा एकदिवसीय 40 षटकांची लीग स्पर्धा असून, रायगडसह नवी मुंबई, मावळ व पुण्यातील नामवंत 16 संघांना स्पर्धेत सहभाग देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे ही स्पर्धा अस्ट्रो टर्फ पिचवर गुलाबी चेंडूंचा वापर होणार आहे. तर प्रत्येक सामना एकदिवसीय फॉरमॅट म्हणजेच 40 षटकांचा असणार असून, विजेत्या व उपविजेता संघांना आकर्षक चषकासह क्रिकेटचे साहित्य बक्षीस म्हणून प्रदान करण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत सहभागी होणार्‍या संघांनी आपली नोंदणी उमाशंकर सरकार 9766530983 ॠषीकेश कर्णूक 8446822947 खोपोली यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version