शेकापक्षातर्फे दिवाळी पहाटचे आयोजन

| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या आयोजनातून दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरांकुर पहाट संगीत मैफिलीच्या माध्यमातून, सोमवार (24) सकाळी 6.15 वाजता हा कार्यक्रम जेएनपीटी टाऊनशिप येथील एमपी हॉल येथे होणार आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जेएनपीटीचे विश्‍वस्त भूषण पाटील व उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव बंडा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गायक गणेश घरत व गायिका लीना अभ्यंकर यांचे सूर श्रोत्यांना ऐकावयास मिळणार आहेत. या कार्यक्रमासाठी पखवाज क्रिश ठाकूर, तबला जयदास ठाकूर, हार्मोनियम मिलिंद म्हात्रे, व टाळ प्रकाश जोशी यांची साथ संगत लाभणार आहे.

Exit mobile version