राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांचा पुढाकार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील युवकांना रोजगाराचे दालन खुले व्हावे, म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रोजगार मिळावा भरविण्यात येणार आहे. शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या पुढाकाराने हा मेळावा मंगळवारी (दि.9) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास होणार आहे.
बारावीपासून पदवीधर झालेल्या तरुणांसाठी हा मेळावा घेण्यात येणार आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. पात्र ठरलेल्या तरुणांना या मेळाव्यातून जागेवर रोजगार नियुक्तीचे पत्र दिले जाणार आहे. रोजगार मेळावा पनवेल येथील निलकंठ दर्शन फ्लॉट क्रमांक 125/ए 4, ओरियन मॉलसमोर होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्ण संधी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. गुणपत्रिका, आधारकार्ड, दोन छायाचित्र, बायोडाटा, पॅनकार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी रोजगार विभाग (7710819681) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







