दिघी येथे राष्ट्रीय पोषण मासाचे आयोजन

। मुरुड-जंजिरा । प्रतिनिधी ।

अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट प्रा.लि. व एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत दिघी येथील बौध्द विहार येथे राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रम साजरा करण्यात आला. राष्ट्रीय पोषण महिना अभियान सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून, माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात येते.

एक महिनाभर चालणारे हे अभियान असून सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश होत असतो.

या कार्यक्रमाला नरेंद्र रावल ,अनिता भायदे,जयश्री काळे, दिघी व कुडगावच्या सर्व अंगणवाडीसेविका, मदतनीस आणि आशासेविका त्याचबरोबर महिला व मुली उपस्थित होत्या.

अनिता भायदे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अंतर्गत पोषण आहार प्रदर्शन स्पर्धा व पोषण समृद्ध रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.

Exit mobile version