रसायनी। वार्ताहर ।
विद्या प्रसारणी सभा चौक संचलित प्राथमिक विद्यामंदिर व शिशू मंदिर शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभा देशमुख,योगेंद्र शहा, देवानंद कांबळे, मुख्याध्यापिका सुलभा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवानंद कांबळे यांनी केले. लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वसंत सरांनी अतिशय छान पध्दतीने केले.तसेच कार्यक्रमाचे सांगता श्री.चेतन यांनी केली.