कर्जत नगरपालिके तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

। नेरळ । प्रतिनिधी ।
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त कर्जत नगरपरिषदेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी नगराध्यक्ष सुवर्णा केतन जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

शहरातील जनता विद्यालय, डोंबे शाळा, जीवन शिक्षण मंदिर, दहिवली तसेच जिल्हा परिषद शाळा आकुर्ले, गुड शेफर्ड, जिल्हा परिषद शाळा, गुंडगे यांच्यासह जय अंबे भवानी विद्यालय, जिल्हा परिषद शाळा भिसेगाव, कन्या शाळा, उर्दू शाळा, मराठी शाळा नंबर एक, शारदा मंदिर इंग्लिश मीडियम, मराठी मिडीयम, महिला मंडळ शाळा, इंग्लिश मीडियम या शाळांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

शहरातील भिसेगाव येथील रायगड जिल्हा परिषदेची केंद्र शाळा भिसेगाव आणि जय अंबे विद्यालयात नगराध्यक्ष जोशी यांच्यासह स्थानिक नगरसेविका पुष्प दगडे, पालिकेचे रवी लाड तसेच अन्य कर्मचारी वर्ग आणि शाळेचे शिक्षक उपस्थित होते.तर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नगराध्यक्षा यांच्यासह नगरसेविका स्वामींनी मांजरे,संचिता पाटील,माजी नगरसेविका बिनिता घुमरे तर शाळा नंबर एक येथे जोशी तसेच नगरसेविका प्राची डेरवणकर,बांधकाम विभागाचे रवी लाड आदी संह शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

Exit mobile version