| तळा | वार्ताहर |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जास्तीत जास्त लोकांनी नैतिकदृष्ट्या मतदान करण्यास प्रवृत्त व्हावे यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देश पातळीवर स्वीप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा, कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वीप पथकाच्या (दि. 27) तळा परिसरात मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य भगवान लोखंडे यांनी मतदार जनजागृतीची लोकशाहीच्या सशक्तीकरणामधील भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी याप्रती बांधीलकी कायम ठेवावी असे आवाहन केले. याप्रसंगी तळा तहसीलदार स्वाती पाटील, नोडल अधिकारी दिपाली शेळके यांनी या स्वीप पथकाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.राजाराम थोरात, डॉ. दिवाकर कदम, प्रा.नितीन पाटील, प्रा.धोंडीबा आंबेगावे, द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार जितेंद्र टेंबे, चंद्रकांत राऊत, किशोर मालुसरे, भारत जाधव, अनिल घोडे, रवी बावदाने, प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारीवर्ग उपस्थित होते.