माथेरानमध्ये कुस्त्यांचे आयोजन

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरानमध्ये दरवर्षी ग्रामस्थ मंडळाकडून वसंत उत्सव साजरा केला जातो. गुढी पाडव्यापासून सुरु होणार वसंतोत्सव हनुमान जंयतीपर्यंत चालतो. माथेरानमधील निसर्गात ज्याप्रमाणे बदल होतात आणि वसंत ऋत्यू सुरु झाल्याची चाहूल लागते, त्याप्रमाणे माथेरानमध्ये गुढी पाडव्याला कुस्त्यांचा फड रंगतो. मुंबई, पुण्यापासून कुस्तीगीर या फाडमध्ये कुस्त्यांच्या सामान्यांसाठी उतरत असतात. यावेळी शहरातील श्रीराम मंदिर चौकातील मैदानावर कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.

गुढीपाडवा हा शुभ दिवस असल्याने महाराष्ट्रात सर्वत्र या हिंदू नववर्ष दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ग्रामस्थ उत्सव मंडळातर्फे दरवर्षी श्रीराम मंदिर येथे जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांकरिता कर्जत-खालापुर, पनवेल, कल्याण, डोंबिवली, पुणे, सातारा, कोल्हापुर येथुन कुस्ती खेळण्यासाठी पैलवान आले होते. या कुस्त्या पाहण्यासाठी माथेरानमधील नागरिकांनी गर्दी केली होती. मातीतील कुस्त्या आजही महाराष्ट्रात खेडोपाडी खेळल्या जातात. या स्पर्धांसाठी माथेरान ग्रामस्थ मंडळाचा पुढाकार होता. त्यात अध्यक्ष प्रकाश सुतार यांच्यासह मंगेश सकपाळ, अनंता शेलार, गिरीश पवार, प्रदीप घावरे, वसंत कदम, घावरे यांच्यासह माथेरान व्यापारी मंडळ अध्यक्ष राजेश चौधरी, माथेरानलॉजिंग बोर्डिंग अध्यक्ष कुलदीप जाधव, अश्‍वपाल संघटनेचे किरण चौधरी आणि भाजप शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ यांचा या स्पर्धेसाठी प्रमुख पुढाकार होता.

कुस्त्यांची सुरुवात लहान मुलांच्या कुस्त्यांपासून झाली. या कुस्त्यांमध्ये जिंकणार्‍याला पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत पारितोषिके देण्यात आली. लाल मातीतील कुस्तीमध्ये सर्वात मोठी कुस्ती 5400 रुपयांची झाली. त्यात पुणे येथील मॉल विजय डोईफोडे आणि कोल्हापूर येथील अनिकेत पाटील यांच्यात झाली. पुणे येथील विजय माने या मल्लाने अंतिम आणि मानाची कुस्ती जिंकली.

Exit mobile version