चौकळशी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

| अलिबाग । वार्ताहर ।
चौकळशी ऐक्यवर्धक मंडळी, मुंबई-गिरगांव व नागांव एकता सामाजिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर मेळाव्याचे आयोजन नागांव ग्रुपग्रामपंचायत अलिबाग येथे करण्यात आले आहे. चौकळशी समाजातील विवाहेच्छूक तरुण-तरुणींसाठी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन शनिवार, (दि.25) ग्रुपग्रामपंचायत नागांव, तालुका अलिबाग येथे दुपारी 3-00 ते सायंकाळी 6-00 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

अ‍ॅड. प्रसाद पाटील, माजी जिल्हा सरकारी वकील व मंदार वर्तक, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते या वधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. नागांव ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल मयेकर, उपसरपंच रसिका प्रधान सुरेंद्र नागलेकर यांची प्रमुख उपस्थित रहणार आहेत.मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी रामचंद्र घरत, विजय नाईक, शशिकला वर्तक, राकेश म्हात्रे, परेश ठाकूर, शौकीन राणे, मंजुषा राणे, मानसी ठाकूर, सुप्रिया म्हात्रे व नागांव ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली आहे.या वधू-वर परिचय मेळाव्यास विवाहेच्छूक तरुण-तरुणींंनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, तसेच आपली नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन चौकळशी ऐक्यवर्धक मंडळी, मुंबई-गिरगांव व नागांव एकता सामाजिक मंडळ-अलिबागच्या आयोजकांनी केले आहे. ही नावनोंदणी फक्त माळी समाजातील विवाहेच्छूक तरुण-तरुणींसाठी असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

Exit mobile version