। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कामोठे शहर शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वाटपाचा समारंभ पार पडला. तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे आभार व्यक्त केले.
यावेळी पमपा जिल्हा चिटणीस, नगरसेवक श्री.गणेश कडू, शंकर म्हात्रे,प्रमोद भगत, युवा नेते सुरेश खरात, गौरव पौडवाल, शेकाप कामोठे शहर कार्याध्यक्ष मधुकर सुरते, शेकाप प्रवक्ता प्रमोद म्हात्रे,ज्ञानेश्वर गायकर, विश्वास भगत,काशिनाथ जाधव, शर्मा, शुभांगी खरात, प्रमोद हाडवले, कुणाल भेंडे, सुनील भेंडे, ज्ञानेश्वर म्हात्रे, रघुनाथ म्हात्रे, संतोष गायकर, गीता उंडे, शुभांगी कड, हरिश्चंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.