एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

रंगरचना कलामंच नाट्य संस्था पनवेल मागील अनेक वर्षापासून विद्यार्थी तसेच नाट्यप्रेमी साठी त्यांच्या अभिनय कौशल्याला वाव मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहे. संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 22 जानेवारी रोजी एकपात्री अभिनय स्पर्धेचे संस्थेने आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपला रंगमंची अविष्कार अभिनय कुणातून सादर करावा. ही स्पर्धा 7 ते 16 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी व त्यापुढील खुल्या गटासाठी आयोजित केली आहे. 7 ते 16 या वयोगटाला 5 मिनिटे व खुल्या गटासाठी 7 मिनिटांचा सादरीकरणाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. ही स्पर्धा विनाशुल्क असून आपल्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. या दोन्ही गटातील प्रथम क्रमांकासाठी 3 हजार रुपये, चषक व , द्वितीय क्रमांकासाठी 2 हजार रुपये, चषक व प्रशस्तिपत्रक आणि तृतीय क्रमांकासाठी 1 हजार रुपये, चषक व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा दि.22 जानेवारी रोजी सायंकाळी 3 वाजता पनेवल महानगर पालिका कार्यालयाजवळ काँग्रेस भवन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत.

Exit mobile version