। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावात गुरुवार, दि. 30 मार्च रोजी रामनवमीनिमित्त रामनवमी उत्सव माणगाव यांच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शोभायात्रेत सर्व धर्म प्रेमींनी बहुसंख्येने सामील होण्याचे आवाहन आयोजक तमाम माणगावकर हिंदू बांधव यांनी केले आहे. यादिवशी दुपारी 3.30 वाजता शोभायात्रेला सुरुवात होणार असून, ही शोभायात्रा साई मंदिर-आदर्श समतानगर-कचेरी रोड-बाजारपेठ बालाजी कॉम्प्लेक्स माणगाव अशी काढण्यात येऊन या यात्रेचे सोनभैरव मंदिर खांदाड माणगाव याठिकाणी सांगता करण्यात येणार आहे.
सायंकाळी 7.30 वाजता श्री राम मंदिर खांदाड येथे आरती होणार असून, रात्री आठ वाजता सोनभैरव मंदिर खांदाड याठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या रामनवमी उत्सवाची माणगावात जय्यत तयारी करण्यात आली असून, माणगाव बाजारपेठेत ठिकठिकाणी रामनवमी उत्सवाच्या कमानी उभारण्यात येऊन अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.