टपाल दिनानिर्मित्त कार्यक्रमाचे आयोजन

। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड – जंजिरा येथील सुमारे 167 वर्षांची पंरपरा असलेल्य नबाबकालीन टपाल कार्यालयातील कर्मचारी वृंदास मुरुड तालुका सेवा निवृत्त कार्यालयाचे अध्यक्ष नयन कार्णिक, नैनिता कर्णिक व समन्वयक एम एस जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. पोस्ट खाते हे सुप्त सिंहासारखे असुन बँका नसलेल्या खेडोपाडी आर्थिक व्यवहार अत्यंत चोखपणे पोस्ट विभाग कार्यरत असुन अतिशय चांगली ग्राहक सेवा देत असल्या बद्दल कर्णिक यांनी गौरवोद्वगार काढले. यावेळी उपडाक कार्यालय प्रमुख पंकज दांडेकर, फैय्याज पंचुलकर,दिपक घाटवळ,विजय शहापूरकर,नंदकिशोर अत्रे,समीर घरत आदी उपस्थित होते.

Exit mobile version