ताणमुक्त यश कार्यक्रमाचे आयोजन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्हा रुग्णालय रायगड, अलिबाग व मनशक्ती केंद्र लोणावळा संचलित अलिबाग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नर्सिंग महाविद्यालय अलिबाग येथे शिकाऊ परिचारिका अध्यापक व परिचारीका यांच्यासाठी ताणमुक्त यश या कार्यक्रमाचे दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते.

पहिल्या सत्रात दोन बैठका झाल्या. शिकाऊ परिचारिका व आध्यापक यांच्यासाठी ताणमुक्त अभ्यास, परीक्षेतील ताण कमी करून धैर्याने सामोरे जाण्याचा मार्ग, एकाग्रता वाढविण्याचे प्रयोग, अभ्यासाच्या सोप्या पद्धती, ध्येय निश्‍चिती, यौवनाच्या क्रांतीदिशा, व्यक्तिमत्त्व विकास, आपल्या पालक व शिक्षकांप्रती कृतज्ञता, या प्रक्रियेतील आनंद आणि समाधान यावर सविस्तर मार्गदर्शन नशक्ती केंद्र जीवनदानी साधक स्वाती आलुरकर व तनुजा देवधर यांनी केले. दुपारच्या सत्रात जिल्हा रुग्णालयातील सर्व ज्येष्ठ परिचारिका यांच्यासाठी कार्यालयीन व वैयक्तिक कामामुळे ढासळते मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक आरोग्य, ताणांचे प्रकार, ताणांचे नियोजन, ताणमुक्ती उपाय या विषयांवर स्वाती आलुरकर यांनी सुमारे दोन तास मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी, अधिसेविका गायत्री म्हात्रे, प्राचार्य सारिका पाटील, उपप्राचार्य सागर साळवे यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version