। पोयनाड । प्रतिनिधी ।
बौद्धजन पंचायत समिती तालुका अलिबाग व बौद्धजन पंचायत समिती शाखा पोयनाड क्रमांक 12 यांच्यावतीने पोयनाड येथील लुम्बिनी बुद्धविहारात आषाढ पौर्णिमा (गुरूपौर्णिमा) निमित्ताने (दि.21) वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दरवर्षी अलिबाग तालुक्यातील विविध शाखांमध्ये आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी हा मान पोयनाड शाखा क्रमांक 12 यांना मिळाला. या मंगलदिनी पोयनाड शाखेमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. वर्षावास कार्यक्रमानिमित्त धम्मपद गाथा आणि कथा या ग्रंथाच वाचन आणि अर्थ बौद्धचार्य आयु.परशुराम ओव्हाळ यांनी केले. यावेळी बौद्धचार्य आयु.नारायण गायकवाड, आयु. सुमित कांबळे, आयु.अशोक मोरे, आयु. शुभांगी जाधव, आयु. प्रभावती मोरे यांनी पूजापाठ आणि संपूर्ण गाथांचे पठण केले. या कार्यक्रमाला अलिबाग तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व सर्व शाखेतील धम्म बांधव, सन्मा.बौद्धचार्य, उपासक आणि उपासिका उपस्थित होते.