150 आंतरराष्ट्रीय स्पर्धक; 4 हजारहुन अधिक अॅथलिट्सचा सहभाग
। मुंबई । प्रतिनिधी ।
आशिया खंडातील सर्वात मोठी आरोग्य आणि फिटनेस स्पर्धा, तसेच इंटरनॅशनल आरोग्य, क्रीडा आणि फिटनेस फेस्टिवल दि. 20 ते 22 डिसेंबर दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये पार पडले. यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप स्टेडफास्ट न्यूट्रिशन प्रो शो आणि शौकीन अॅथलिट्ससाठी भारतातील सर्वात मोठी बॉडीबिल्डिंग टूर्नामेंट अमॅच्युर ऑलंपिया या दोन प्रमुख स्पर्धांचा समावेश होता. या दोन्ही स्पर्धांना भारतातील दिग्गज स्पोर्ट्स आणि वेलनेस न्यूट्रिशन ब्रँड स्टेडफास्ट न्यूट्रिशनने प्रायोजकत्व लाभले होते. स्टेडफास्ट न्यूट्रिशन प्रो शो आणि अमॅच्युअर ऑलंपिया जगभरामध्ये बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपसाठीची गव्हर्निंग बॉडी इंटरनॅशनल फिटनेस अँड बॉडीबिल्डिंग फेडरेशन अंतर्गत आयोजित केले गेले.
गेल्या पाच वर्षांपासून स्टेडफास्ट न्यूट्रिशन आयएचएफएफचा एक महत्त्वाचा सहयोगी आहे. या ब्रँडने भारतातील फिटनेस उद्योगाला अतिशय आवश्यक असलेले प्रोत्साहन दिले आहे आणि भारतीय बॉडीबिल्डिंग अॅथलिट्ससाठी सर्वात मोठ्या जागतिक मंचावर स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. प्रो शो जिंकणार्या अॅथलिट्सना जगातील सर्वात प्रतिष्ठित बॉडीबिल्डिंग स्पर्धा, मिस्टर ऑलंपिया यूएसएमध्ये थेट प्रवेश मिळतो. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात 150 आंतरराष्ट्रीय स्पर्धक, 80 हजार दर्शक आणि उद्योगक्षेत्रातील दिग्गजांसह 4 हजारहुन जास्त ऍथलिट्स सहभागी झाले होते. तसेच, 200 पेक्षा जास्त प्रदर्शक असलेले हे जगातील सर्वात मोठे आरोग्य, क्रीडा आणि फिटनेस एक्स्पो ठरले.
यावेळी बोलताना स्टेडफास्ट न्यूट्रिशनचे संस्थापक अमन पुरी यांनी सांगितले की, भारत क्रीडा प्रतिभांचे पॉवर हाऊस आहे. या टुर्नामेंट्सना सहकार्य करून आम्ही जागतिक स्तरावर भारतीय अॅथलिट्सच्या यशासाठी एक सुस्पष्ट रोडमॅप बनवू इच्छितो, त्यांच्यासाठी जिंकणे ही एक सवय बनवू इच्छितो आणि भारतीय बॉडीबिल्डिंगला जागतिक मानकांपर्यंत नेऊ इच्छितो. 2040 पर्यंत भारत जगाची क्रीडा राजधानी बनावा या आमच्या दृष्टिकोनाला अनुरूप हे पाऊल उचलण्यात आले आहे. 2022 मध्ये प्रो शो सुरु करणार्या देशाचा पहिला आणि एकमेव ब्रँड म्हणून स्टेडफास्टने भारतीय ऍथलिट्ससाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप-मिस्टर ऑलंपिया यूएसएमध्ये प्रवेश मिळवण्याचा मार्ग खुला केला आहे. त्यांना तिथे जिंकण्याची, पुरस्काराची रक्कम, आंतरराष्ट्रीय मान्यता आणि आकर्षक प्रायोजकत्व मिळवण्याची अनोखी संधी मिळाली आहे. अरनॉल्ड श्वार्जनेगर, फिल हेल्थ आणि डेक्स्टर जॅक्सन यासारख्या दिग्गजांनी याच मंचावर आपले लिजंडरी स्टेटस मजबूत केले असल्याचे त्यांनी सांगितले.