उद्धर येथे शेतीशाळेचे आयोजन

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील उद्धर येथे पारसबागेतील भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर जिल्हा अंतर्गत प्रशिक्षण व रानभाजी शेतीशाळा गुरुवार, दि. 30 जून रोजी घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. परसबागेतील भाजीपाला लागवड व रानभाजी आहारातील महत्त्व, त्यांच्या प्रक्रिया याबाबत मांजरेकर यांनी माहिती दिली. तसेच भोसले यांनी कृषी विभागाच्या योजनाची माहिती दिली. महिला आर्थिक विकास महामंडळ अलिबागच्या विविध योजनांबाबत महिला गटांना शमीर चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात प्राजक्ता पाटील यांनी शेवलं व कोळीची भाजी यांची पाककृती सांगून त्या प्रात्यक्षिकांद्वारे त्या करून दाखविण्यात आल्या. त्यानंतर उपस्थित महिलांना पारसबाग भाजीपाला किट वाटप करून या कार्यक्रमाची सांगता आयसीएम टाळी पध्दतीने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी राधिका चव्हाण आणि सोनाली पाटील याचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र रोहा डॉ. आर. मांजरेकर, मंडळ कृषी अधिकारी पाली बी.सी. वाळके, कृषी पर्यवेक्षक यू.डी. भोसले, कृषी सहाय्यक खिल्लारे, मृणाल केळकर तसेच महिला बचत गटातील सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन व आयोजन प्राजक्ता पाटील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले.

Exit mobile version