जागतिक अपंग सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

। अलिबाग । वार्ताहर ।
नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड (नॅब) रायगड अ‍ॅक्टीव्हीटी सेंटर, अलिबाग येथे जागतिक अपंग सप्ताहानिमित्त नॅब संस्थेतील दिव्यांगांना शासनाने अपंगांसाठी बनवलेल्या सोयीसुविधांबद्दलची माहिती देण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड (नॅब) रायगड अ‍ॅक्टीव्हीटी सेंटर, अलिबागच्या संचालिका वृंदा थत्ते, त्यांच्या सहाय्यक सहकारी प्रतिभा बाणे, उर्मिला भारती तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा विषयाचे मार्गदर्शक जिल्हा परिषद अपंग कल्याण कक्षाचे समाजकल्याण सल्लागार किशोर वेखंडे व नॅब, अलिबाग या संस्थेतील सर्व दिव्यांग उपस्थित होते. या मार्गदर्शनपर कार्यक्रमात जिल्हा परिषद अपंग कल्याण कक्षाचे समाजकल्याण सल्लागार किशोर वेखंडे यांनी शासनाने अपंगांसाठी बनवलेल्या सोयीसुविधांबद्दलची माहिती दिली व मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी उपस्थित सर्व दिव्यांगांच्या समस्या ऐकून त्याच्यावर त्यांना सल्ले दिले व मार्ग सुचवले. तसेच शासनाने दिलेल्या ज्या योजना दिव्यांगांना माहित नव्हत्या किंवा ज्या योजनांपासून ते वंचित होते त्यासाठी त्यांची नावे लिहून घेऊन त्यांना त्या योजना मिळवून देणार असल्याचे आश्‍वासन किशोर वेखंडे यांनी दिले.

Exit mobile version