। सारळ । वार्ताहर ।
प्रत्येक भारतीय नागरिकाला आधारकार्ड असून ते अद्यवत असणे ही काळाची गरज आहे. एखादे काम अडकल्यावरच व्यक्ती आधार अपडेट करण्यासाठी धावपळ करत असल्याचे दिसते. त्यात खाजगी आधारकेंद्राची सेवा शासनाचे बंद केल्याने अनेक नागरिकांना आधार अपडेट करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि रायगड डाक विभागाचे अधीक्षक अविनाश पाखरे यांच्या समन्वयातून खास जनतेसाठी सरकारी दरात आधार दुरस्ती व नवीन आधार करण्याचे शिबीर अलिबाग नगरपरिषद येथे दिनांक 13 ते 18 नोव्हेंबर पर्यंत (रविवार सोडून) आयोजित केला आहे. अशा प्रकारचे शिबीर आयोजित केल्याने जास्तीत जास्त जनतेला याचा लाभ घेता येईल. सोबत डाक विभागाच्या विविध सरकारी योजनांची माहिती ही यावेळी देण्याचा मानस डाक विभागातर्फे सुनील थळकर साह्य अधीक्षक अलिबाग यांनी व्यक्त केला आहे.