। सुकेळी । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील ऐनघर येथील बी.सी.जिंदल रुग्णालयाच्यावतीने (दि.13) व (दि.20) जुन रोजी दोन वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. (दि.13) जुन रोजी शरीरातील रक्ताचे प्रमाण व (दि.20) जुन रोजी रक्तातील साखरेचे प्रमाण असे दोन शिबिर होणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरीकांची रक्ताची तपासणी करुन योग्य असे मार्गदर्शन डॉ. गोपाळ परमार करणार आहेत.
तसेच, जिंदल रुग्णालयाची सेवा ही गोरगरीबांच्या सेवेसाठी 24 तास सुरू करण्यात आली असुन विविध आजारांवरती तज्ञ डॉक्टरांच्या भेटी देखिल सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये ह्रदयरोग तज्ञ डॉ. समिर वनकर, स्त्री रोग तज्ञ डॉ. रोहीणी खेरा भट्ट, अस्थिरोग तज्ञ डॉ. शरिफ दुदेकुला, डॉ. नितिश अरोरा, डॉ. आर. जे. गड्डम, मुत्र रोग तज्ञ डॉ. विकास बिशे, बाळरोग तज्ञ डॉ. आनंद वागळे, दंतरोग तज्ञ डॉ. संकेत म्हात्रे, कान, नाक, घसा तज्ञ डॉ.हर्ष गुजराथी, त्वचारोग तज्ञ डॉ.मंदार माने आदि डॉक्टरांच्या भेटी जिंदल रुग्णालयात सुरु करण्यात आल्या आहेत. तरी या सर्व सुविधांचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ परमार यांनी केले आहे.