नागाव येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन
। अलिबाग । वार्ताहर ।

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व रणसंग्राम क्रीडा मंडळ, नागावच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 5 मार्च रोजी जिल्हास्तरीय खुला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी सहा वाजता शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 15,001 रुपयांचे पारितोषिक व भव्य चषक, द्वितीय क्रमांकासाठी 11,001 रुपये व भव्य चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी 7,001 रुपये व भव्य चषक असे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.यासोबतच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूला फ्रीज व चषक, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड करणार्‍याला कूलर व चषक, तर पब्लिक हिरो ठरणार्‍याला मनगटी घड्याळ व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Exit mobile version