जिल्हास्तरीय मराठी पाठांतरित काव्य स्पर्धेचे आयोजन

। अलिबाग । वार्ताहर ।
ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबाग कमळ नागरी सहकारी पतसंस्था अलिबाग यांच्या सौजन्याने जिल्हास्तरीय मराठी पाठांतरित काव्य स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा मंगळवारी (दि. ३ मे) ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबाग-कार्यालय येथे होणार आहे. ही स्पर्धा फक्त मराठी भाषेत पार पडणार असून १२ ते १६ ओळींची स्वरचित कविता या स्पर्धेचे आयोजक अनंत देवघरकर – ९४२०६४५७२८ या मोबाईल क्रमांकावर २० एप्रिलपर्यंत पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच कविता सादरीकरणासाठी ४ मिनिटांची वेळ दिली जाणार आहे. स्पर्धेच्या चार विजेत्यांना रोख रक्कम प्रदान करण्यात येईल.

Exit mobile version