| अलिबाग । वार्ताहर ।
मुलभूत अधिकार संघर्ष समिती, म.गांधी वाचनालय पेण, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून रोजगार हक्क परिषदेचे आयोजन मंगळवारी (दि.26) करण्यात आले आहे. दरवर्षी हजारो, लाखो तरूण एमपीएससी, यूपीएससी, डिप्लोमा, डिग्री इंजिनीयर्स, शिक्षक, आयटी आय शिक्षण पूर्ण करतात. परंतु हजारो लाखो रोजगारांची उपलब्धत शासन करून देत नाही. परिणामी बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.26 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता आगरी समाज हॉल, चिंचपाडा पेण येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये चार सत्र असणार आहेत. पहिल्या सत्रामध्ये रोजगार अधिकार मुलभूत अधिकार या विषयावर प्रा.किशोर ठेकदत्त मुंबई, अॅड.सुरेश माने मुंबई, अरविंद वैद्य पुणे यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून रत्नाकर महाजन पुणे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर दुसर्या सत्रामध्ये शासकीय धोरण आणि बेरोजगारी या विषयावर प्रा.मृदुला निळे मुंबई विद्यापीठ, भूषण सामंत कामगार नेते मुंबई, पंकज पासवान, महेश सामंत देश की बात फाऊंडेशन व या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आनंद करंदीकर व्यवस्थापन तज्ज्ञ पुणे असणार आहेत.
तिसर्या सत्रात ग्रामीण भारत आणि बरोजगारी या विषयावर प्रा.डॉ.सुरेंद्र मोरे धुळे, प्रा.घनश्याम दरणे यवतमाळ, हिरालाल पगडाल संगमनेर, प्रशांत खंदारे पुसद व अध्यक्षस्थानी विश्वास उटगी ठाणे हे असणार आहेत. व चौथ्या सत्र हे खुले असून यामध्ये ठराव आणि आंदोलनाची रूपरेखा या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या परिषदेत प्रवेश निशुल्क असून सहभागी सदस्यांची चहापाणी, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9822307725 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







