मांदाटणे येथे कार्यक्रमांचे आयोजन

| आंबेत | वार्ताहर |

हरित ग्राम सेवा संस्था महाड व आदर्शगाव ग्रुप ग्रामपंचायत मांदाटणे यांच्या सहकार्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने शुक्रवार, दि.6 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गाव, वाडी स्त्यांवर, स्वच्छतेची जागृती करून गावातील सार्वजनिक ठिकाणे, ग्रामपंचायत, शाळा, मंदिरे, अंतर्गत रस्ते, पाणवठाची ठिकाणे इत्यादी ठिकाणी या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. हरित ग्राम सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कडू यांनी मार्गदर्शन करताना आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचं प्रमाण वाढीसाठी प्रत्येकाने परसबाग केली पाहिजे, आपण आजारी पडू नये यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे व स्वच्छतेबरोबर निरोगी आरोग्याचेही महत्त्व यावेळी उपस्थितांना सांगितले. तसेच महिलांचे रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी पुढील काळात संस्थेच्या माध्यमातून तपासले जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली.

याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव यांच्या मदतीने मांदाटणे व पास्टी ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रा.आरोग्य विभाग अधिकारी डॉ. गीतांजली हंबीर, परिचारिका साधना, पाटील मॅडम, सरपंच चंद्रकांत पवार, हरित ग्राम सेवा संस्था अध्यक्ष राजेंद्र कडू, ग्रामसेवक पी.बी. ठाकरे, ग्रामकार्यकर्ता प्रकाश लाड, आरोग्य मित्र धनश्री मुंडे, प्रियंका धोकटे, ग्रा.पं. सदस्य नीता पवार, मीनाक्षी मनवे, शुभांगी शिगवण, राजाराम दिवेकर, किसन शिंदे, संतोष मुंडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version