। खांब-रोहे । वार्ताहर ।
शेतकरी सभा रोहे तालुका संघटनेच्यावतीने आज तालुक्यातील धानकान्हे येथे दु.3:30 वा.शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेतकरी सभा नेते रमेश ठाकूर, कामगार नेते अॅड.विजय पाटील, शेतकरी नेते विजय मोहिते, व्हि.टी.देशमुख, उस्मान रोहेकर, जयवंत पोकळे,बाबूराव बामणे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. सदरच्या मेळाव्यात शेतकरी वर्गाच्या ज्वंलत व प्रलंबित मागण्यांसाठी संदर्भात विचारविनिमय होणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी सभेच्या वतीने करण्यात आले आहे.