पनवेल येथे खो-खो पंच परीक्षेचे आयोजन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. 15 ) पनवेल येथे जिल्हास्तरीय खो-खो पंच परीक्षा घेण्यात येणार आहे. रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने पनवेल तालुका क्रीडासंकुल, तहसील कार्यालयाजवळ पनवेल येथे ही परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी महिती रायगड जिल्ही खो-खो असोसिएशनचे कार्यवाह आशिष पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, क्रीडाप्रमी खो-खो पंच परीक्षेेस बसू शकतील. अधिक महितीसाठी आशिष पाटील 9421164817, राज्य क्रीडा मार्गदर्शक मनिषा मानकर 7020555329, लावण्य मगर 9987077317, अमोल जाधव 9773422214 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version