संगीत मैफिलीचे आयोजन

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

पं. वामनराव भावे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून मुरूड येथील पै. आबीद हुसेन खां स्मृती संगीत मंडळाने ‘गुण गाऊँ कैसे तुम्हारे’ हा कार्यक्रम रविवारी,(दि.26) संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत पनवेल कल्चरल सेंटरच्या सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विभावरी बांधवकर, कविता गाडगीळ, शीतल कुंटे, मिलिंद गोखले, मंगेश लटके, डॉ. रवींद्र नामजोशी, मालविका बर्डे, राजेंद्र काळे, मिलिंद जोशी, आनंद अभ्यंकर इत्यादी आपल्या गायनातून त्यांना आदरांजली वाहतील. निवेदक किशोर सोमण या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. पं. वामनराव भावे यांची छायाचित्रे, आठवणी, चीजा या माध्यमातून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला जाईल. शहरापासून दूर असलेल्या भागात शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या पं. वामनराव भावे यांच्याविषयीच्या माहितीपूर्ण व रंजक कार्यक्रमातून या संगीतोपासकाच्या जीवनपटाचा आनंद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन मंडळाचे कार्यवाह डॉ. रवींद्र नामजोशी यांनी केले आहे.

Exit mobile version