प्रीतम म्हात्रेंनी दिल्या कलाकारांना शुभेच्छा
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून गेली 26 वर्षे पनवेल फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. पनवेल फेस्टिवल 2023 पनवेल येथे सुरू झाले आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी फेस्टिवलला भेट दिली. फेस्टिवलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कलाश्रुती अकॅडमीच्या माध्यमातून पनवेलच्या वृषाली पाटकर यांच्या नियोजनात पनवेलमधील कलाकारांनी ‘धरोहर पहचान भारत के इतिहास की’ या नृत्याविष्काराचे सादरीकरण केले. फेस्टिवलमध्ये शेकडो प्रकारचे स्टॉल्स आहेत. तेथील विविध स्टॉल्सला त्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू आणि चविष्ट खाद्यपदार्थांचा त्यांनी आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल रोटरी फेस्टिवलचे चेअरमन शिरीष पिंपळकर, रोटरी क्लब ऑफ पनवेलचे पी.आर. डायरेक्टर उन्मेष लोहार, पास्ट प्रेसिडेंट शिरीष नांदेडकर, ज्येष्ठ रोटरीअन अमर म्हात्रे, राजाभाऊ गुप्ते आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.